| तळा | वार्ताहर |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पोलीस मुख्यालय कळंबोली पनवेल येथे पार पडल्या. या स्पर्धेत गो.म.वेदक विद्या मंदिर व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तळा या सर्व स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे.
14 वर्षे वयोगट मुली फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा गटात रितिका भारसिंग 30 किलो वजनीगट द्वितीय क्रमांक,अनुष्का शिंदे 39 किलो खालील वजनी गट द्वितीय क्रमांक, समीक्षा सावंत हिने 73 किलो खालील वजनी गट प्रथम क्रमांक पटकाविला. 17 वर्षे वयोगट फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा मुलींच्या गटात समृद्धी मंडलिक 65 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, समृद्धी साळुंखे हिने 61 किलो वजनी गट प्रथम क्रमांक पटकाविला. 17 वर्षे वयोगट ग्रोकोरमन कुस्ती प्रकारात
ईकराम कर्देकर 65 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, साहिल पवार याने 55 किलो वजनी गट द्वितीय क्रमांक पटकाविला. 19 वर्षे मुलगे फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात तळकर दीपेश 86 किलो वजनीगट प्रथम क्रमांक ,जय वायकर याने 61 किलो वजनी गट द्वितीय क्रमांक पटकाविला. 19 वर्षे वयोगट मुलगी ग्रीकोरमन कुस्ती प्रकारात शुभम मांढरे 60 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, मोरेश्वर बरदाड 63 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, विक्रांत खांडेकर 82 वजनी गट प्रथम क्रमांक, नागे रितेश याने 55 किलो वजनीगट द्वितीय क्रमांक पटकाविला. 19 वर्षे मुलींच्या फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात सायली शिंदे 55 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, कृतिका झोरे 68 किलो वजन गट प्रथम क्रमांक आणि गौरी पेरणेकर हिने 58 वजनी गट द्वितीय क्रमांक पटकाविला.