चोरून नेत असलेल्या केमिकलला विमानात आग

मुंबई विमानतळावर भयंकर दुर्घटना टळली

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई विमानतळावर एका विमानाला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठी खडबळ उडाली आहे. येथील विमानात काहीजनांनी छुप्या पद्धतीने केमिकल नेण्याच प्रयत्न करण्यात आला होता. पण केमिकल विमानात लोड होत असताना आग लागल्याचे समोर आल्याने मोठी दुर्घटना टळली. फॉरेन्सिक तपासणीत केमिकल हायड्रोजन स्पिरीट असल्याच निष्पन्न झाले आहे. दरम्यान या प्रकरणी सहारा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

हायड्रोजन स्पिरिट बेकायदेशीररित्या ईटी-641 या फ्लाइटने मुंबईहून आदिस अबाबाला नेले जात होते. लोडिंगच्या वेळी आग लागली यावरून हे केमिकल किती धोकादायक आहे याचा अंदाज येतो. विमान उड्डाणानंतर ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे उपस्थित लोकांनाही इजा झाली असती. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अधिकारी सध्या या प्रकरणातील रसायनांचे स्वरूप तपासत आहेत आणि लोडिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्या सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे का? तसेच आगीमागे काय कारण आहे याचा तपास पोलीस, विमानतळ सुरक्षा आणि विमान कंपनीचे अधिकारी करत आहेत. या घटनेनंतर आग त्वरीत आटोक्यात आणण्यात आली असून, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या परिस्थितीमुळे विमानतळावरील धोकादायक वस्तूंच्या हाताळणी आणि वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Exit mobile version