। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दक्षिण तैवानमध्ये गुरुवारी 13 मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली. यामध्ये 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर डझनहून अधिकजण जखमी झाले आहेत. काऊशुंग शहर अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, आग पहाटे तीनच्या सुमारास लागली. आग खूप भीषण होती, ज्यामुळे इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले.







