| कोलाड | प्रतिनिधी |
कडाक्याच्या थंडीचा फायदा उठवत कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाटा जवळ असणार्या सी 2 हंस-प्रीत रेसिडेन्सी मधील दोन घरे चोरट्यांनी फोडली असून, यात रोख रक्कम सह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या चोरीचा तपास कोलाड पोलीस करीत आहेत.
या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार संतोष सानप व मंगेश राजीवडे यांच्या राहत्या बंद घरातून दरवाजांचा कडी कोयंडा व कुलुप तोडुन त्यावाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचा लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीचा अधिक तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत.






