| खोपोली | वार्ताहर |
सावरोलीतील राकेश पवार या तरुणाचा येथील रेल्वे पटरीवर सेल्फी घेत असताना मालगाडीच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या वाजण्याच्या दरम्यान घडली.
राकेश आपल्या मित्रांबरोबर झेनिथ वॉटर फॉल जवळून डोंगर चढत ट्रेकिंगला गेला होता. तेथून ते सर्वजण मंकी हिल बोरघाटातील रेल्वे रुळाच्या परिसरात पोहचले. तेथे असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूलाच सेल्फीमध्ये रेल्वे घेत असताना वेगात येणार्या मालगाडीला शरीराचा एक भाग घासल्याने राकेश खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला.या प्रकाराने सोबतचे मित्रही घाबरुन गेले. त्यांनी त्याला उपचारांसाठी दुसर्या मालगाडीतून तासाभरानंतर कर्जतकडे आणले खरे, मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खोपोली पोलिसात करण्यात आली आहे.
सेल्फी घेताना मालगाडीची धडक; युवकाचा मृत्यू
