विद्युत तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

| तळा | वार्ताहर |

तालुक्यात अल्युमिनिअमच्या विद्युत तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तळा पोलिसांना यश आले असून, आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तळा तालुक्यात मागील काही दिवसांपासून डीपी फोडून त्यातील विद्युत अल्युमिनिअमची तार चोरीला जाण्याच्या घटनात वाढ झाली होती. तालुक्यातील टोकार्डे, राममंदिर परिसर व कासेखोल या ठिकाणी चोरट्यांनी डीपी फोडून चोरी केली होती. यातील आरोपींना पकडण्यासाठी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी पथक नेमले होते. या पथकातील पोलीस हवालदार सुरेश पवार आणि संजय शिंदे यांनी गुप्तहेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या चोरांना पकडले. या चोरांना पकडल्यामुळे सर्वस्तरातून हवालदार सुरेश पवार व हवालदार संजय शिंदे यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version