मोहोपाडा ग्रामपंचायतीत भरला दिव्यांगांचा मेळावा

| रसायनी | वार्ताहर|

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सभामंडपात मंगळवार, दि.5 डिसेंबर रोजी दुपारी दिव्यागांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील एकूण लाभार्थीं 88 दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सर्वप्रथम ज्येष्ठ दिव्यांग बांधव रवींद्र कोशे यांचा सरपंच उमा मुंढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांचे सरपंच उमा मुंढे यांनी आभार मानून विविध शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी दिव्यांग बांधवांनी काही लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ न मिळाल्याचे सांगितले. एकूण 88 लाभार्थीमधील 37 लाभार्थीं लाभापासून काही महिने वंचित असून, त्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी उपस्थित दिव्यांग व सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे यांनी केली. यावेळी विनोद शिंदे यांनी दिव्यांग बांधवांशी निगडीत असणाऱ्या समस्या उपस्थित केल्या. या समस्यांचे लवकरच निरसन करणार असल्याचे सरपंच उमा मुंढे, ग्रामविकास अधिकारी सचिन कुऱ्हाडे यांनी आश्वासन दिले. यावेळी दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी सुनील माळी उपस्थित होते.

Exit mobile version