। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ जवळील बिरदोले गावातील महाविद्यालयीन तरुणीने सुरु केलेल्या वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या शाळेत माथेरान येथील दाते नितीन शहा यांनी भेट दिली. त्यांच्या माध्यमातून सर्व 33 मुलांना कपडे, खेळणी आणि खाऊचे वाटप केले. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे या विद्यार्थिनीने दामत येथे असलेल्या वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरु केली आहे. त्या शाळेत शिकणार्या मुलांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर माथेरान येथील नितीन शहा या व्यवसायिक यांनी संपर्क साधून मुलांना भेटवस्तू, कपडे आणि खेळणी देण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानुसार नितीन शहा यांनी दामत येथे जाऊन वीटभट्टीवर शाळेत शिकतात याची माहिती घेतली.तयावेळी त्यांच्या माध्यमातून सर्व 33 मुलांना नवीन कपडे भेट दिले.त्याचवेळी खेळणी आणि खाऊ याचे वाटप केले. वीटभट्टीवरील मुलांसाठी वेळ काढून शिकविणार्या भाविका जामघरे हिच्या या कामाचे कौतुक संदीप म्हसकर यांनी केले.