। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथे बसमध्ये चढत असताना महिलेच्या हातातील पर्समधून 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 10:45 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद श्रद्धा संतोष जंगम, खेड,जि.रत्नागिरी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. माणगाव ते म्हसळा या गाडीमध्ये चढत असताना श्रद्धा जंगम यांच्या उजव्या हाताच्या पर्समधील असणारी एक पिवळसर रंगाची 1 तोळा वजनाची सोनसाखळी चोरट्याने चोरून नेली.