तालुकास्तरीय खो-खो व कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक
| महाड | प्रतिनिधी |
तालुकास्तरीय खो-खो व कबड्डीच्या स्पर्धा दिनांक 26 व 27 सप्टेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत को ए सो गं द आंबेकर हायस्कूल व चं गं मेहता जूनियर कॉलेज, बिरवाडी च्या मुलांनी 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे तसेच मुलींनी 14 वर्षे व 19 वर्षे वयोगटात खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच कबड्डी 14 वर्षे मुले प्रथम क्रमांक व 19 वर्षे मुली प्रथम क्रमांक मिळवून एकूण 12 संघा पैकी 7 संघ तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचा बहुमान को ए सो गं द आंबेकर शैक्षणिक संकुल बिरवाडी ला मिळाला आहे. पुढील जिल्हास्तरीय सामन्यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या शालेय क्रीडा स्पर्धेत महाड तालुक्यातून सांघिक खेळाचे नेतृत्व महाड तालुक्याच्या वतीने गं द आंबेकर बिरवाडी हायस्कूल साठी व विद्यार्थ्यांसाठी महाड तालुका गटशिक्षणाधिकारी, बीडिओ पंचायत समिती शिक्षण विभाग महाड व तालुकास्तरीय क्रीडा आयोजक मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. या उत्तुंग यशाबद्दल शाळा समिती सभापती श्री सतीश मोरे साहेब, प्राचार्य श्री शंकर राठोड सर, शाळा समिती सदस्य , शिक्षक-शिक्षकेतर वृंद, पालक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक श्री राजुदास पवार सर तसेच सहायक शिक्षक श्री बाळासाहेब दहिफळे, श्री सुधीर गोरे, श्री महादेव गायकवाड तसेच सौ निमिषा उपाध्ये व सौ अंजली गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कसून सराव घेत आहे .