राजेंद्र इलेवन ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी
| खारेपाट | वार्ताहर |
वीर बजरंग क्रीडा मंडळ मोठे शहापूर या संघाने मोठे शहापूर येथील आदर्श विद्यामंदिर आदर्श नगर मोठे शहापूरच्या क्रीडांगणावर शनिवारी (दि. 23) डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पंचक्रोशितील एकवीस संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दु. ठिक 4 वाजता सुदर्शन मधुकर पाटील (एस्.एम्. पाटील सर), अनिल म्हात्रे धेरंड अध्यक्ष क्रिकेट असोशिएशन (सदस्य गृपग्रामपंचायत शहापूर), परदेसी थळे सामाजिक नेतृत्व यांच्या शुभहास्ते क्रीडांगणाचे पुजन आणि श्रीफळ वाढवून झाले. एस्.एम्.पाटील यांनी स्पर्धेतील सहभागी संघाना शुभेच्छा देताना; स्पर्धा स्वतःशीस करा…. काल केलेला रेकॉर्ड आज मोडीत काढा; असे बोलून खेळाडूंना संबोधित केले. या स्पर्धेत राजेंद्र इलेवन हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, द्वितीय ईलेवन फायटर, तृतिय बहिरीचा पाडा, चतुर्थ न्यू अष्टविनायक पेप्सी अनुक्रमे या संघाना यश मिळाले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विर बजरंग क्रीडा मंडळ मोठे शहापूरच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली होती, त्यांना पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनी मोलाची साथ दिली होती. या स्पर्धेस पंच, जाणकार प्रेक्षकांची उत्तम साथ लाभली होती. त्यामुळेच स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.