पीएनपी चषकाचे शानदार अनावरण

आमदार जयंत पाटील यांची सदिच्छा भेट

| अलिबाग प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानावर रायगड जिल्ह्यातील पहिली सर्वात मोठी डे-नाईट क्रिकेट स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. पीएनपी चषक क्रिकेटचा महासंग्राम सर्वांना प्रत्यक्षात आणि घरबसल्या पाहता येणार आहे. या पीएनपी चषकाचा अनावरण सोहळा शनिवारी (दि. 10) जल्लोषात साजरा करण्यात आला. युवराज पाटील यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, सरपंच संतोष गावंड, तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या सोहळ्यास अलिबाग नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर तसेच अन्य मान्यवरांनीदेखील हजेरी लावली. पीएनपी चषकाचे अनावरण झाल्यावर विद्युत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेच्या धर्तीवर असलेल्या भव्यदिव्य अशा पीएनपी चषक स्पर्धेच्या चषक अनावरण सोहळा पाहण्याचा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना मिळाला.

या स्पर्धेमध्ये सुपर प्लेअर्स आंबेपूर संघाचे मालक सवाई पाटील, कर्णधार सुमीत भगत, जिजा अंश 11 संघाचे मालक संदेश बैकर, भूपेंद्र पाटील, कर्णधार सुमेध पत्रे, ए 3 सोगाव संघाचे मालक वसिम कुर, कर्णधार पराग खोत, अमृत स्पोर्ट्‌‍स सासवणेचे मालक दर्शन वाकडे, कर्णधार सागर पाटील, त्रिशव्या 11 वरसोलीचे मालक मयुरेश सारंग, कर्णधार साहील खांबे, सुरेश काका 11 वरसोलीचे मालक सुरेश घरत, कर्णधार शिरू विक, रेड हॉर्स 11 नवगावचे मालक प्रमोद घासे, कर्णधार विनोद वाटकरे, अक्षय्या हॉटेल चेंढरेचे मालक आनंद पाटील, कर्णधार निखील पाटील, प्रसाद 11 अलिबागचे मालक ॲड. मानसी म्हात्रे, कर्णधार नागेश शिद, साईकृपा साई नगर खंडाळेचे मालक नासिकेत कावजी, कर्णधार अदिल कुरेशी, 7700 जिजाऊ 11 चेेंढरेचे मालक प्रथमेश पाटील, कर्णधार प्रसाद पाटील, आझाद 11 कुरुळचे मालक अवधूत पाटील, कर्णधार शिवतेज पाटील, प्राणशी 11 रोहाचे मालक मयंक ठाकूर, कर्णधार यश पारंगे, मुस्कान 11 मांडलाचे मालक रिझवान फहीम, कर्णधार हुसेन टक्के, यशश्री बिल्डींग कन्स्ट्रक्शन थेरोंड्याचे मालक अभय ठाकूर, कर्णधार अजय चौलकर, श्रावणी स्पोर्ट्स चौलचे मालक निलेश नाईक, राजन ठाकूर, कर्णधार आकाश तवसालकर, रुद्र वॉरिअर्स आक्षीचे मालक मंदार वर्तक, पंकज नाखवा, कर्णधार अक्षय पाटील, सिया वॉरिअर्स नागावचे मालक सचिन राऊळ, कर्णधार फहद कलबस्कर, नाखवा वॉटर स्पोर्ट्‌‍स साखरचे मालक उलनेश नाखवा, दिनेश नाखवा, शैलेश नाखवा, कर्णधार प्रफुल्ल पाटील, प्रदीप स्पोर्ट्‌स साखरचे मालक राजेश नाखवा, जनार्दन नाखवा, कर्णधार निखील धरवे, रोशनशू 11 केतकीचामळाचे मालक अजिंक्य पाटील, कर्णधार मनीष मोकल, ज्ञानी 11 नांगरवाडीचे मालक मोहन धुमाळ, कर्णधार जयेश शेळके, ए.बी. ग्रुप अलिबाचे मालक कपिल अनुभवणे, कर्णधार पंकज जाधव, आदिरा वॉरिअर्स कावाडेचे मालक अभिषेक पाटील, कर्णधार अक्षय म्हात्रे यांचा सहभाग असणार आहे.

अलिबागसह मुरुड, रोहा तालुक्यातील खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून चांगली संधी मिळावी यासाठी पीएनपी चषक 2024 या स्पर्धेसाठी मुख्य आयोजक म्हणून भूमिका बजावत आहे. आज राज्य, देश, जागतिक पातळीवर होणारे खेळ अलिबागमध्ये होत असल्याचा आनंद समाधानकारक आहे.

नृपाल पाटील, संचालक, पीएनपी इन्फ्रा

टेनिस क्रिकेट स्पर्धेला चांगले दिवस आहेत. आज अलिबागमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. त्याचा आनंद आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा आनंद यातून मिळत आहे.

पकंज जाधव, कर्णधार, एबी ग्रुप संघ
Exit mobile version