| पाली/बेणसे | वार्ताहर |
श्रीगाव येथ सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दि मदर तेरेसा मेमोरियल सोशल वेल्फअर ट्रस्ट आणी टीसीपीएल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सभासदांनी शिस्तबद्ध पद्धतीने शिबीराचे कामकाज पार पाडले. लहु ना. म्हात्रे, अरुण पाटील, कमलाकर पाटील, डॉ. शंकर शितोळे, जितेश्री पाटील, काशीनाथ पाटील, बबन पिंगळे, मनोज पाटील, प्रभाकर घरत, दत्तात्रेय पाटील, प्रणाली राऊत, ॲड. दामोदर पाटील, अँथनी राजन, अरुण देवरुखकर, रिटा जॉय स्वतः उपस्थित होते.







