आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
। उरण । प्रतिनिधी ।
राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या शिष्ट मंडळासोबत मंगळवारी (दि.19) त्यांच्या दालनात सभा घेतली. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च ते 9 मार्च बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
या सभेत समितीचे राज्य संघटक सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, नचिकेत मोरे, कमलेश राणे, राजन भानुशाली, कृष्णा भोयर उपस्थित होते. तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यावेळी पगार वाढ व अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.







