आरोग्य सेवकाला हृदयविकाराचा झटका

कर्जत सराईवाडी येथील घटना

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. चंद्रकांत आंबाजी वारगुडा असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंजप हे उप केंद्र असून तेथे चंद्रकांत वारगुडा हे आरोग्यसेवक म्हणून जबाबदारी पाडत होते. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता वारगुडा हे आपले सहकारी आरोग्य सेवक ज्ञानेश्वर पारधी आणि मोहन तिवरे यांच्यासोबत पाणी तपासणीसाठी अंजप येथील बोरिवली ग्रामपंचायतमधील सराईवाडी येथे जाण्यासाठी निघाले होते. दुचाकीवरून हे तिघे सराईवाडीमध्ये पोहचले. तेथील पाण्याचे नमुने घेऊन परतत असताना वारगुडा हे अचानक जमिनीवर कोसळले. जमिनीवर पडल्याने त्यांच्या तोंडाला आणि डोळ्याला दुखापत झाली. त्याचे सहकारी तिवरे आणि पारधी यांनी रुग्णवाहिका बोलवली. मात्र, अंतर जास्त असल्याने ती वेळेवर पोचली नाही. नंतर खासगी गाडीने कशेळे ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी वारगुडा यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. त्यांचा मृतदेह कशेळे तेथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. नंतर अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांची मृतदेह सुधागड येथे नेण्यात आला.

Exit mobile version