भावपूर्ण श्रद्धांजली! नेटीझन्सकडून सीडीएस बिपीन रावत व जवानांना अखेरचा सलाम

अलिबाग । वर्षा मेहता ।
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 लष्करी जवानांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला आणि डोळ्यात अश्रू आले. हेलिकॉप्टर अपघातात लष्करी जवानांचा मृत्यू झाला. शोकाकुल कुटुंबियांना शोकसंवेदना आणि प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहणारे संदेश सर्व सोशल मीडियावर होते.
त्यासह, आयएएफ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग, हेलिकॉप्टर दुर्घटनेतील एकमेव बचावलेले संरक्षण कर्मचारी यांना गुरवारी तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयातून बेंगळुरूला हलवण्यात आले आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी लोकांनी प्रार्थनाही केली. संरक्षण अधिकार्यांनी गुरुवारी अपघातग्रस्त भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर पुनर्प्राप्त केला, जो मब्लॅक बॉक्सफ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सोशल मिडीयावर हॅशटॅग सीडीएस बिपीन रावत, इंडियन आर्मी सोबत ब्लॅक बॉक्स देखील ड्रेंड झाले.
संरक्षण अधिकार्यांनी शोध क्षेत्र हे अपघातस्थळापासून 300 मीटरचे एक किमीपर्यंत शोध क्षेत्र वाढवले आहे. ब्लॅक बॉक्स बुधवारी डोंगरांवरील शोकांतिकेला कारणीभूत असलेल्या घटनांच्या महत्त्वपूर्ण डेटा प्रदान करेल असे म्हटले जात आहे.

Exit mobile version