उष्णतेची लहर त्यात डासांचा कहर

। पनवेल । प्रतिनिधी ।

उष्णतेमुळे अंगाची काहीली होत असतानाच नागरिकांना आता डासांचाही सामना करावा लागत आहेत. त्यात रात्रीच्या सुमारास वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे.

यंदा उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडाव्यासाठी एसी, पंख्यांचा वापर वाढला असून विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणच्या विजवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडून विजवाहिन्या खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. उष्णतेपासून सुटकेसाठी अनेक नागरिक दरवाजे खिडक्या उघड्या ठेऊन वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अचानक डासांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे उघड्या असलेल्या खिडक्या दरवाज्यांमधून डास घरात घुसत नागरिकांचे चावे घेत आहेत. डासांच्या चाव्या मुळे झोप मोड होत असल्याने कळंबोली कामोठे वसाहती मधिल नागरिक संध्या हैराण आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरु होताच मच्छरांच्या त्रासात देखील वाढ होते. तसेच, डासांच्या चाव्यामुळे होणार्‍या आजारात देखील वाढ होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केले जात आहे.

Exit mobile version