| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
द्या एक हात मदतीचा उपक्रमास सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद असून, चेंबूर मुंबई येथील महिला मंडळ ‘मुस्कान फाउंडेशन’ यांनी द्या एक हात मदतीचा या उपक्रमास मौलिक साथ दिली.
आदिवासी मुलांच्या शिक्षणाला खाकी वर्दीचा आधार या शीर्षकाखाली पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांचा कार्य अहवाल पाहून मुंबई चे श्री महेश अंबेकर मुस्कान फाऊंडेशनच्या माध्यमातून हातोंड येथील जिल्हा परिषद शाळेस एक स्टील कपाट, टेबल, मुलांना ब्लँकेट, टॉवेल, साबण, खाऊ तसेच क्रीडा, शैक्षणिक साहित्य देत सामाजिक व नैतिक बांधिलकी जोपासली.
यावेळी मुस्कान फाउंडेशनच्या पदाधिकारी ज्योती हंकारे, रेणुका पुजारी, करुणा लालगे, सोनाली पुजारी, वैशाली मैराले, प्रांजली कोलारकर, पूर्वा आंबेकर यांचे योगदान व सहकार्य लाभले. तसेच श्री पुजारी साहेबांचे व श्री कोलारकर साहेब सर्वांची काळजी घेणारे सहकार्य स्मरणात राहणारे ठरले. मुख्याध्यापक अजितसिंह पाटील यांनी शाळेची माहिती दिली. योगेश भांड, अंकुश काकरा यांनी नियोजन केले. यावेळी ग्रामसेविका ज्योती मदने, सुनंदा वाघमारे, अर्चना वाघमारे, घुनाथ वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती.