। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख निर्मित पहिल्या मराठी चित्रपटात म्हणजेच हाउसफुल सुपर हिट असणाऱ्या वेड चित्रपटात अलिबागची साईली प्रथमेश पाटील हिने छोटीशी भूमिका साकारली आहे. सदर चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२२ मध्ये अलिबाग परिसरात झाली होती. साईली वयाच्या चौथ्या वर्षापासून फॅशन शो व अॅक्टींग करत आहे. साईलीची आई कादंबरी काळे पाटील या वकील असून वडील ही वकील आहेत. त्याच बरोबर अलिबाग मधील श्रीयोग मोरे, आनंद पाटील व आरीन कांबळे हे देखील सदर चित्रपटा मध्ये कलाकार म्हणून सहभागी आहेत.