बचत गटांना मदतीचा हात

। माणगाव । प्रतिनिधी ।

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या नागरिक सेवा फाऊंडेशन माणगावच्यावतीने दिवाळी निमित्ताने विविध महिला बचत गटांना मदतीचा हात देऊन आर्थिक मदत करण्यात आली.

तालुक्यात दिवाळीनिमित्त विविध महिला बचत गट हे फराळ बनवून त्याची विक्री करत असतात. या महिला बचत गटांना भांडवल व विक्रीची मोठी समस्या असते. ही समस्या ओळखून महिला बचत गटांच्या माध्यमातून माणगाव पंचायत समिती येथे हिरकणी महिला बचत गटांच्या माध्यमातून फराळाच्या वस्तूंची विक्री करणार्‍या महिला बचत गटांना आर्थिक मदत दिली आहे. त्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी यासाठी रोख रक्कम धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी माणगावचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार, नागरिक सेवा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक देशमुख, सुशील कदम, संजय गांधी, रत्नदीप आंबरे, भालचंद्र खाडे, अजित शेडगे, गणेश गोरेगावकर, पुंडलिक मालोरे, रुपेश वाढवल, काशिनाथ गाणेकर आदींच्या उपस्थित होते.

Exit mobile version