। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि.30) एका अनियंत्रित इको कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास कार्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज एक इको कार चालक पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि कारने रस्त्यावरील एका ऑटो-रिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पुढे असलेल्या एका वॅगनआर कारलाही धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या या कारची एका पादचाऱ्याला धडक बसली, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षा चालक सुद्धा जखमी झाला आहे. सदर मयत व्यक्तीचे नाव धर्मेंद्र चौधरी असे आहे. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात; एकाच मृत्यू
