। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील बोनशेत गावात श्याम फडके व रुपेश फडके यांच्या घराला रविवारी (दि.2) रात्री आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत घरातील सर्व साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही; मात्र कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. ग्रामस्थांनीही तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. ही घटना पनवेल तालुका परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.
बोनशेत गावातील घराला भीषण आग
