| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल, एमजेपी कार्यालयाजवळ रस्त्याच्या मध्ये एनएमएमटी बस थांबवल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीने बसला ठोकर मारली. या अपघातात बोनशेत तेथील गोरखनाथ फडके हा तरुण जखमी झाला आहे. या अपघातात त्याच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.
गोरखनाथ फडके हा पनवेल वरून बोनशेतला दुचाकीने जात होता. बस चालकाच्या चुकीमुळे गोरखनाथ याची दुचाकी बसला पाठीमागून धडकली. यात त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याला निल हॉस्पिटल, नवीन पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. एनएमएमटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.