मुरुडमध्ये घरावर दरड कोसळली

। मुरुड । प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील एकदरा गावात मंगळवारी (दि.16) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महेश साळुंखे व श्रीकेश साळुंखे यांच्या घराच्या मागील बाजूस दरड कोसळली असून, महेश यांच्या स्वयंपाक घराचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने महेश यांची पत्नी स्वयंपाक घरातील कामे उरकून हाॅलमध्ये गेल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे. येत्या काही दिवसांत रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तरी अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नसताना जर इतका नुकसान होत असेल तर अति मुसळधार पाऊस सुरू झाला तर किती नुकसान होऊ शकते याचा विचार करण्याची गरज आहे.

Exit mobile version