| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. त्यातील एक खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि दुसरा सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर गाणपती. सध्या नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नव वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविक पर्यटकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. येथे आलेल्या भक्तांची राहण्याची सोय करण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानच्यावतीने दोन भक्तनिवासांमध्ये अतिशय अल्पदरात चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. हे भक्तनिवास भरले तरी इतर खासगी लॉज देखिल उपलब्ध आहेत. अनेक भक्त महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेऊन पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आसपास असलेली फुल, हार, नारळ, प्रसाद, पुजेचे साहित्याची दुकाने सजली आहेत. असे येथील व्यवसायिक राहुल मराठे यांनी सांगितले.
अष्टविनायक तीर्थक्षेत्री पर्यटकांची मांदियाळी
