चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते स्वागत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल येथील असंख्य तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग विधानसभा मतदार संघातील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे अनेकांना मदतीचा हात मिळाला. तसेच, ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजेत, या भुमिकेतून त्यांनी मुलींना सायकली वाटप केल्या. त्यांच्या अनेक कामांबाबत अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदार संघातील नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन चौल मधल्या तरूणांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. हा छोटेखानी पक्ष प्रवेश सोहळा मंगळवारी (दि.22) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शेकापचे सुरेश घरत व नवनिर्वाचित तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रखडलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. चित्रलेखा पाटील आमदार झाल्यावर नक्कीच मागण्या पूर्ण करतील ही खात्री आहे.
– चौलमधील नवनिर्वाचित कार्यकर्ते