भारतीय हॉकीसाठी थोडी खुशी, थोडा गम

पुरुष संघांची न्यूझीलंडवर मात, महिलांचा नेदरलॅकडून पराभव
टोक्यो | वृत्तसंस्था |
भारतीय हॉकीसाठी शनिवारचा दिवस ‘थोडी खुशी, थोडा गम’ असाच काहीसा होता. सकाळी पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंड संघावर 3-2 च्या फरकाने अप्रतिम विजय मिळवला. पण सायंकाळी महिला हॉकी संघाला नेदरलँडकडून 5-1 असा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी 24 जुलै रोजी भारताच्या दिवसातील शेवटच्या स्पर्धेत भारतीय महिलांना नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला.

तीन वेळा ऑलिम्पिक विजेता संघ नेदरलँडने सलामीच्या सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. सामना सुरु होताच पहिला गोल करत नेदरलँड संघाने सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 10 व्या मिनिटाला लगेचच भारताची कर्णधार राणीने गोल करत सामन्यात भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघाना गोल करता आला नाही. पण, अखेरच्या काही मिनिटांत नेदरलँड संघाने तुफानी खेळी करत एका मागोमाग एक गोल करत 4 गोल केले आणि 5-1 च्या फरकाने सामना जिंकला. भारतीय महिलांचा पुढील सामना 26 जुलैला जर्मनी संघासोबत होणार आहे.

Exit mobile version