। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील कोपर केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा केंद्रप्रमुख किशोर पाटील यांच्या नेतृत्वात रा.जि.प. शाळा हनुमान पाडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसाठी लगोरी, बेचकीने नेम धरणे, तसेच मुलींसाठी लंगडी आणि दोरी उडी या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तर, व्यक्तिमत्व विकास अंतर्गत पारंपारिक गीतावर नृत्य, समूहगीत गायन, पथनाट्य आणि मातीचे शिल्प तयार करणे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
यावेळी, स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्र प्रमुख किशोर पाटील यांच्यासह अनंत म्हात्रे, मारुती पाटील, र.मो. पाटील, शिक्षक वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, स्पर्धा काळात सरपंच जयवंती पाटील, उपसरपंच गणेश घरत, माजी सरपंच प्रवीण पाटील, सरपंच राकेश दाभाडे, युवराज म्हात्रे, सरपंच वाघमारे तसेच जोहे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी भेट दिली.स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आला.