तळा तालुक्यातील शेतकर्याचा प्रयोगशीलतेला यश
। तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील वावेहवेली येथील तरुण शेतकरी सहदेव पारावे यांनी आपल्या कष्टाने व मेहनतीने आपल्या शेतात भाजीपाला लागवड यांचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. ज्यामध्ये शिराली भाजी उत्पादनातून त्यांनी भरघोस कमाई केली आहे. सुरूवातीला या शिराली लागवडीसाठी 30 हजार रुपये खर्च आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दिड एकरात शिराली भाजीचे मोठ्या प्रमाणात लागवड करुन उत्पादनाला सुरवात केली आहे. दोन दिवसांआड 400 किलो शिराली निघत आहेत. अशा प्रकारे हे पिक मोठ्या प्रमाणात उत्पादन देत आहेत. साधारणतः 40 रुपये किलो दराने ही शिराळी घाऊक बाजारापेठेत जात आहे. या शेतकर्यांनी या आधी मिरची, कारली, काकडी, भेंडी, मुळा, टरबुज यासारखे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे.
सदरच्या भाजीला स्थानिक बाजारपेठेत हवी तशी मागणी नसल्याने ही भाजी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये जात आहे. तरीही या भाजीला घाऊक भाव 40 रुपये किलो दराने हा माल वाशी-नवीमुबंई बाजारपेठेत विक्रीला जात असून भरगोस उत्पन्न मिळत आहे.
वावे लघुपाटबंधारे विभागाच्या खालच्या बाजूला असणार्या बारमाही नदी वाहत असुन या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करीत असतात. गेली अनेक वर्षे मी स्वतः शेतात राबवून भाजीपाला लागवड करीत असतो. या वर्षी मी शिराळी लावली. उत्पादन ही चांगले आले असुन त्यांची विक्री चालू झाली आहे.
सहादेव पारावे, प्रगतशिल शेतकरी, वावे हवेली
शिराळीच्या उत्पादनातून भरघोस कमाई
