सुदैवाने जीवितहानी नाही
। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने बसचालक आणि बसमधील केअर टेकरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, बस जाळून खाक झाली आहे.
पुण्यातील खराडी भागातील फिनिक्स वर्ल्ड स्कुलची ही बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडायला निघाली होती. या बसमधे पाचवी आणि सहावीत शिकणारी मुलं होती. रस्त्यात बसला अचानक आग लागली. मात्र प्रसंगावधान राखुन ड्रायव्हर आणि केअर टेकरने बसमधील मुलांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. बसला आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे कारण समोर आले नाही. मात्र, या आगीत बस जळून खाक झाली आहे.