• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ. थोरवेंना जोरदार धक्का! सूनबाईंचा दारुण पराभव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 9, 2026
in sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जतमध्ये परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड

| कर्जत | प्रतिनिधी |

मोठे वेणगाव गणात आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे यांचा झालेला पराभव हा कर्जत तालुक्यातील निवडणुकीचा सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला. शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी 607 मतांनी त्यांचा पराभव करत ‌‘जायंट किलर’ ठरत मोठा राजकीय संदेश दिला. या निकालानंतर कर्जत तालुक्यात कर्जत परिवर्तन आघाडीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आ. महेंद्र थोरवेंसह महायुतीला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीने महायुतीला जोरदार धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीने जिल्हा परिषदेच्या सहाही गटांवर निर्विवाद विजय मिळवत संपूर्ण तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच पंचायत समितीच्या 12 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवत आघाडीने महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे. या निकालामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा राजकीय झटका बसल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

महायुतीतील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांना प्रत्येकी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तीन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला तसेच स्वबळावर एक जागा लढवणाऱ्या मनसेला पंचायत समितीत प्रवेश करता आलेला नाही. मात्र, जिल्हा परिषद गटात स्वबळावर लढणाऱ्या भाजपने आघाडी व महायुतीला चुरशीची लढत दिल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट असून, त्यापैकी कळंब गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नारायण डामसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरिचंद्र निरगुडा यांचा अवघ्या 206 मतांनी पराभव केला. कशेळे गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वर्षा सुरेश दोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला भरत शीद यांचा 3719 मतांनी दणदणीत पराभव करत मोठा विजय मिळवला. माणगाव तर्फे वरेडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा योगेश मिसाळ यांचा केवळ 19 मतांनी पराभव केला. या गटात स्वबळावर लढलेल्या भाजपच्या राधिका किशोर ठाकरे यांनी 5098 मते मिळवत जोरदार लढत दिली.

नेरळ गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सुरेश टोकरे यांचा 883 मतांनी पराभव केला. कडाव गटात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मारुती उर्फ बाबू घारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे योगेश कांबेरे यांचा 1955 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मोठे वेणगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उषा शंकर ठोंबरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता वसंत वाघमारे यांचा तब्बल 5547 मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला.

पंचायत समितीच्या 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत झाली. पोशीर गणात महायुतीकडून शेकापच्या रेशमा अनिल जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या हर्षला वेहले यांचा 1024 मतांनी पराभव केला. कळंब गणात शिवसेना ठाकरे गटाच्या कमलाबाई शिंगवा यांनी महायुतीतील शेकापच्या नीलम वसंत ढोले यांचा 1747 मतांनी पराभव केला. पाथरज गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता भरत पादीर यांनी शिवसेना-शेकाप महायुतीच्या अश्विनी कांता पादीर यांचा 1971 मतांनी पराभव केला.

कशेळे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय राम तिटकारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिन बालकृष्ण भोईर यांचा 1419 मतांनी पराभव केला. माणगाव तर्फे वरेडी गणात शिवसेना शिंदे गटाचे महेश सुरेश विरले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संदेश रमेश हजारे यांचा 178 मतांनी पराभव करत विजय मिळवला. उकरूल गणात शिवसेना ठाकरे गटाच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील यांचा 2749 मतांनी दणदणीत पराभव केला, तर भाजपच्या सुप्रिया राजेश भगत यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नेरळ गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे भगवान बाळकृष्ण चंचे यांनी भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तब्बल 3368 मतांनी पराभव केला. दामत गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महेश लक्ष्मण खारीक यांनी भाजपचे माजी सदस्य नरेश सुरेश मसने यांचा 1190 मतांनी पराभव केला. वाकस गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन जयराम धुळे यांनी शिवसेना शिंदे गटाचा 1114 मतांनी पराभव केला. कडाव गणात शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा चेतन पवाळी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संध्या सुदाम पवाळी यांचा 699 मतांनी पराभव केला.

Related

Tags: chiitra thackereindiakarjat newskrushival mobile appmaharashtramahendra thorvemarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssweta thorve
Previous Post

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

Next Post

उरणमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post
उरणमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व

उरणमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?