एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज

। खोपोली । वार्ताहर । 

महाराष्ट्रात काही काळापूर्वी घुमलेला एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज पुन्हा एकदा रायगडच्या भूमीत निनादणार आहे. खालापूर कर्जत तालुक्यात दि.26 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनाचे आयोजन करण्यासंदर्भात नुकताच सभा घेण्यात आली.कोरोना महामारीत थंडावलेले जन आंदोलन पुन्हा प्रखर करण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकदा आपले संविधानिक हक्क व अधिकार प्राप्त करण्यासाठी सकल मराठा समाजाचे प्रणेते खासदार संभाजीराजे खालापूर तालुक्यात येणार असून, सध्याच्या परिस्थितीत सकल मराठा समाजात अनेक तरुण शिक्षित झाले आहेत. मात्र आरक्षण नसल्याने त्यांना नोकरी मिळत नाही. शैक्षणिक धोरण व नोकरी तसेच इतर शासकीय सुविधा मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने 8 ते 10 वर्षे आंदोलन केले. सरकारने मिळालेले आरक्षण टिकवले नाही, कायदेशीर लढाईत यावेळी प्रखरतेने लढा देण्यासाठी कोविड काळात थांबलेली लढाई पुन्हा जोमाने लढण्यासाठी हक्काच्या आरक्षणासाठी लढाई तीव्र गतिमान होणे गरजेचे आहे. जे आरक्षण आमच्या वाटेला येत आहे, तेच आरक्षण आम्ही मागत आहोत, यासाठी मागील काळात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, कर्जत तसेच महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी मोर्चे आंदोलन करून लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित राहून शांततेत आंदोलन केले. अधिकाराची लढाईत गतिमान करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. याबाबत जनजागृती होण्यासाठी गावनिहाय बैठका आयोजित केल्या जात असून छत्रपती संभाजीराजे आपल्या तालुक्यात येणार असल्याने सर्व मराठा समाज बांधवांनमध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version