एमएमए स्पोर्ट्सची मॅरेथॉन उत्साहात

| महाड | प्रतिनिधी |
कंपनीत काम करणारे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महाड उत्पादक संघटना स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रविवारी (दि.11) मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समर्थ रामदास विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला आ. भरत गोगावले, महाड उत्पादन संघटनेचे अध्यक्ष आणि एमएमएसीईटीपीचे चेअरमन संभाजी पठारे, एमएमए सीईटीपीचे उपाध्यक्ष अशोक तलाठी, महेश पुरोहित, रमेश मालुसरे, बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

या मॅरेथॉन स्पर्धेत 5 वर्ष ते 7 वर्ष वयोगटात मुलींमध्ये द्रोणा देवगिरकर, आस्मी खांबे, स्वामीनी गांगल, सृष्टी सालेकर या अनुक्रमे पहिल्या चारमध्ये आल्या. याच वयोगटातील मुलांमध्ये ॠतुराज राणे, लकी तरे, श्रेयस कदम, पृथ्वीराज दळवी हे पहिल्या चारमध्ये आले. 8 वर्ष ते 10 वर्ष वयोगटात मुलींमध्ये श्रावणी मोरे, जान्हवी खराडे, पूर्वा शिंदे आणि आवनी शिर्के या अनुक्रमे पहिल्या चारमध्ये आल्या. याच वयोगटातील मुलांमध्ये धैर्य जाधव, जागृत झांजे, वेदांत कदम, आदर्श दडस हे पहिल्या चारमध्ये आले.

18 वर्ष ते 35 वर्ष वयोगटात मुलांमध्ये अजय बालगुडे, मनीष दुधाणे, अनिल वर्मा आणि तेजस पेंढारी हे अनुक्रमे पहिल्या चारमध्ये आले. 35 ते 50 वर्ष वयोगटात समीर विचारे, उमेश धामणसे, अमोल वारंगे आणि योगेश भुवड हे पहिल्या चारमध्ये आले. 50 वर्ष आणि त्यावरील गटात विनोद उतेकर, प्रमोद उतेकर, अरुण पवार आणि सतिश प्रतापपुरे हे पहिल्या चारमध्ये आले. सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता एमएमए स्पोर्टस क्लबच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. एमएमएचा हा क्रीडा महोत्सव पुढे दोन महिने सुरु राहणार असून, यामध्ये कॅरम, चेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा समावेश असणार आहे.

Exit mobile version