। पनवेल । वार्ताहर ।
दोन मुलांना घेऊन एक विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना उलवेमध्ये घडली आहे. याबाबतची तक्रार तिच्या पतीने उलवे पोलीस ठाण्यात दिली आहे. जन्नतुनीसा जाकीर हुसेन (25) असे या महिलेचे नाव असून, तिची उंची 5 फुट 3 इंच, रंग- गोरा, बांधा- मध्यम, चेहरा- उभट, नाक- सरळ, केस- काळे, अंगात काळ्या रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लेगीन्स, पायात काळ्या रंगाची चप्पल, हिंदी, भोजपुरी भाषा बोलते समजते सोबत रेडमी कंपनीचा मोबाईल फोन आहे. तसेच सोबत मुलगा फिरोज जाकीर हुसेन (8) व समीर जाकीर हुसेन (4), यांना घेऊन गेली आहे. या तिघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवे पोलीस ठाणे किंवा पोहवा रामचंद्र घागरे यांच्याशी संपर्क साधावा.







