| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळासह जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध आघाड्यांच्या पदाधिकारी, सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता सुरु होणार आहे.
या बैठकीत शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आदी प्रमुख मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच पक्ष वाढीबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करून शेकापची असलेली भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. शेकापच्या जिल्हा व तालुका स्तरावरील विविध आघाड्यांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, विविध आघाड्याच पदाधिकारी, सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.






