। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा आळी आंबिवली येथून श्रेयश पांडुरंग पिंगळे (15) हा अल्पवयीन आहे. हे माहित असूनसुद्धा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यास फुस लावून पळवून नेल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात त्याचे वडील पांडूरंग जगन्नाथ पिंगळे यांनी केली आहे. श्रेयशचा आजुबाजूला नातेवाईक, मित्र- मैत्रिणी व गावात शोध घेतला असता कुठेही श्रेयसचा थांगपत्ता लागला नाही. तो अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची पाच फुट, चेहरा गोल, नाक पसरट, अंगात लांब बाहिचा चौकटीचा गुलाबी व फिकट राखाडी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची लांब पॅट, पायात निळ्या रंगाची चप्पल, त्याला मराठी भाषा बोलता येते. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे अधिक तपास करीत आहेत.







