| पनवेल | वार्ताहर |
पनवेल बस स्टँण्ड येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याने त्या व्यक्ती विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उज्वला उर्फ रोशनी श्रीधर कातकरी (16) वर्ण सावळा, बांधा सडपातळ, उंची 4 फुट 8 इंच, केस काळे, डोळे काळे, चेहरा गोल असून अंगात हिरवा व फिक्कट नारंगी रंगाचा फ्रॉक सोबत मोबाईल फोन आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सपोनि बजरंग राजपूत यांच्याशी संपर्क साधावा.







