| माणगाव | प्रतिनिधी |
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडली असताना अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगाव तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना डिसेंबर 2022 मध्ये घडली असून याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गुरुवारी (दि. 28) माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी भावेश राजाराम यादव (वय 23) याने पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही डिसेंबर 2022 मध्ये तिला आपल्या राहत्या घरात बोलावून तिच्यावर आत्यचार केला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली.
या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतीष अस्वर हे करीत आहेत.