| महाड | वार्ताहर |
महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शाळेत शिकणार्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार अत्याचार केले आहेत. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपी याने मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपी विरोधात बलात्कार तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.