। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 17) उघडकीस आला आहे. ही घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिचा लैंगिक छळ केला गेला होता. पीडित मुलगी ही सध्या 17 वर्षांची असून, ही घटना 2021-2022 च्या दरम्यान झाल्याचे समजले आहे. त्यावेळी दोन व्यक्तींनी मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. जर त्यांच्या म्हणणे ऐकले नाही तर कु़टुंबियांच्या जीवावर बेतू शकतं अशी धमकी देत, दोघांनी मुलीचा लैंगिक छळ केला. 17 ऑक्टोबर ला पीडितेने हिम्मत दाखवून अखेर आरोपींविरूद्ध रायगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तक्रारीनुसार, दोन आरोपींविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेला तिच्या कुटुंबीयांच्या जिवाची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर प्रकरण वर्ग होऊन महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास पोसई व्ही. बी. फडतरे हे करत असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.





