पेण आदिवासी पट्ट्यात फिरता दवाखाना

| पेण | प्रतिनिधी |
शासकीय आरोग्य यंत्रणेत या बाबत अलर्ट जारी असला तरी जनतेचा ओघ खाजगी दवाखान्यात उपचारार्थ जाण्यावर दिसुन येतो.दुर्गम भागातील वयोवृद्ध, निराधार, कष्टकरी जनतेला मात्र हे दोन्ही पर्याय सोयीचे किवां परवडणारे वाटत नाहीत. यावर तात्पुरता पर्याय म्हणून अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशन मार्फत रूग्णसेवे करीता फिरत्या दवाखान्याचे आयोजन करण्यात आले आहे. या द्वारे मोफत आरोग्य तपासणी बरोबरच पेण मधिल आदिवासी पट्ट्यात मोहीम राबविण्यात येत आहे.

या अभियाना बाबात बोलताना डॉ.मैत्रेयी पाटील म्हणाल्या आदिवासी महिलांची परिस्थिती कोणत्याही संसर्गजन्य आजारात इतरांपेक्षा जास्त बिकट दिसुन येते.हिमोग्लोबीन ची पातळी कमी असणे , कॅल्शियम ची कमतरता, कुपोषण आदि बाबी मुळे प्रतिकार शक्तीच कमी झाल्यास संसर्ग जन्य रोगाचे शिकार कष्टकरी जनता सहज पडते, अर्थात प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी केवळ औषधोपचारच नाही तर आर्थिक स्तर उंचावून जीवनमान सुधारणै जेणे करून प्रतिकार शक्ती वाढु शकेल आणि हा जनजाग्रृतीकरण्या बरोबरचा प्रभावी पर्याय असु शकेल. तसेच या रोगाचे उगमस्थान आणि संचयावरील उपाय,स्वर्जित प्रतिरक्षण आणि उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणीबाबत आग्रह हा आवश्यक आहे. सदर मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यासाठी आदिवासी समाजातील तरूणी याना दरमहा प्रशिक्षण देण्यात येत असुन या मध्ये निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क चे विद्यार्थी आणि अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशन चे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सदर अभियान पेण तालुक्यातील एकूण 40 आदिवासी वाक्यांमध्ये राबविण्यात येत आहे

Exit mobile version