| पेण | प्रतिनिधी |
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, तहसिल कार्यालय पेण, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी आणि आरोग्य विभाग पंचायत समिती पेण यांचे वतीने खाउसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ तांबडी या पाचवाडयांसाठी तांबडी ठाकुरवाडी येथे जातीचे दाखले व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पेण पं.स.गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन संतोष ठाकुर उपस्थितीत बुधवार 5 जुलै रोजी करण्यात आले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे के.यू.चव्हाण, मारुती गायकवाड, पेण मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, बोरगाव ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक गणेश पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, राजू पाटील, सुनील वाघमारे, धावटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शितल पाटील, आरोग्य सेविका रंजना खडसे, शैला पाटील, संजीवनी भोईर, अशोक ठाकुर, ज्ञानेश्वर पाटील, राकेश शेडगे तुकाराम भोसले आदी उपस्थित होते.