| पेझारी | वार्ताहर |
को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाड येथे को.ए.सो.चे ज्येष्ठ संचालक माजी आ. पंडित पाटील यांनी वृक्षारोपण करण्यात आले. याकार्यक्रम प्रसंगी त्यांनी वाढलेले प्रदूषण, वाढलेल्या पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शाळांनी एक विद्यार्थी – एक झाड तर नागरिकांनी एक व्यक्ती- एक झाड हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे आवाहन याप्रसंगी केले. केवळ वृक्षारोपण करून उपयोगाचे नाही तर त्याचबरोबर वृक्षसंवर्धन करणे ही तितकेच गरजेचे आहे, असेही यावेळी ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, संदीप पाटील, शाळेचे माजी प्राचार्य सौ. हळदवणेकर, रणदिवे, कुलकर्णी, फडतरे, प्राचार्य शशिकांत पाटील, सत्र प्रमुख तृप्ती पिळवणकर, उदय पाटील आरएसपी व एनसीसीचे मार्गदर्शक समाधान भंडारे, संजय डोंगरे, देवेंद्र पाटील,अविनाश पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी, आरएसपी विद्यार्थी पथके या सर्वांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला. सायली पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.