| अलिबाग | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील महाळुंगे (महादेवखार) येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. हिराजी कांडणेकर यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही सभा होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शोकसभा ग्रामपंचायत महाळुंगे येथील मैदानात होणार आहे. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन शंकरराव म्हसकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश मढवी, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, रायगड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर उपस्थित राहणार आहेत. रोहा तालुका शेकाप पदाधिकारी, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शोकसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







