मुलाच्या शोधासाठी आईचा जीव कासावीस

कर्जत पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातून ऑक्टोबर 2023 मध्ये हरवलेल्या मुलांबाबत सहा महिन्यानंतर देखील कर्जत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्या मुलाच्या आईची स्थिती आपला मुलगा हरवून सहा महिने झाल्यानंतर शोध लागत नसल्याने कुठे कुठे शोधू अशी झाली आहे.

24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता कर्जत शहरातील ओम धर्मोदय अपार्टमेंटमध्ये राहणारा श्रेयस यशवंत देशमुख (22) हा मुलगा मानसिक तणावामुळे घरातुन निघुन जात असल्याची चिठ्ठी टेबलावर ठेवुन घरातुन निघून गेला तो आजपर्यंत घरी परतलेलाच नाही. मुलगा घरातुन निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची आई सुजाता देशमुख यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरविल्याची मिसिंग तक्रार नोंदवली आहे. या केसचा तपास त्यावेळी सहाय्यक फौजदार संजय जगताप हे करीत होते. परंतु, महिना झाला तरी मुलाचा शोध लागत नसल्याने वैफल्यग्रस्त असलेल्या सुजाता देशमुख या जगताप यांना त्याबाबत विचारणा करत होते. मुलाकडे असलेल्या मोबाईलचे सिडिआर लोकेशन पुर्णपणे बंद आल्यामुळे मुलाला शोधण्यात अपयश येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ज्या-ज्या ठिकाणी मुलाला पाहिले गेले त्या-त्या ठिकाणी आम्ही शोध घेतला आहे. तसेच, इतरही अनेक ठिकाणी शोध घेऊन मुलगा ज्या-ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्या-त्या ठिकाणी त्याचे स्केच व माहिती दिलेली आहे. मुलाला शोधण्यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत असुन मुलाचे हरविल्याचे पोस्टरही बनवण्यात आले आहे. परंतु, काही दिवसांपुर्वीच मुलाला स्वार्मीच्या मठात पाहिले असल्यामुळे पोस्टर लावणे थांबवले आहे. कारण, पोस्टर पाहून जवळपास असलेला मुलगा दुर कुठे जायला नको. तसेच, कर्जत पोलीस लवकरच मुलाला शोधुन काढतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

Exit mobile version