कामोठेत फिल्मी स्टाईल दरोडा

| पनवेल | वार्ताहर |
कामोठे वसाहती मध्ये असलेल्या एका बंद ज्वेलर्सच्या दुकानात अज्ञात चोरटयांनी केलेल्या घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. बसंत बहार सोसायटीमध्ये असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी करण्यात आली. अगदी फिल्मी स्टाईलने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. कामोठे वसाहतीमध्ये लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे ज्वेलरी शॉप आहे.

या दुकानावर चोरट्यांनी संध्याकाळी धाडसी दरोडा टाकला. यासाठी चोरट्यांनी ज्वैलर्स दुकानाच्या शेजारी असलेल्या एका खानावळ दुकानातील कॉमन भिंतीला भगदाड पाडून चोरटे सोनाराच्या दुकानात शिरले. यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने ज्वेलर्स दुकानातील तिजोरी फोडली. तिजोरीतील चांदी आणि सोन्यावर चोरट्याने डल्ला मारून चोरटे फरार झाले. या दरोड्यामध्ये जवळपास 10 किलो चांदी चोरल्याचे समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर कामोठे पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

Exit mobile version