उरणमध्ये नवे गटविकास अधिकारी

| उरण | प्रतिनिधी |

उरण पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी समीर वठारकर यांची पनवेलला बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर अखेर सर्जेराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

त्यांच्या स्वागतासाठी घारापुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बळीराम ठाकूर आणि उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पण, खरं स्वागत जनतेकडून होणार आहे. कारण, उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा सपाटा सुरू आहे. लोकांचे प्रश्न वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहेत.नवे गटविकास अधिकारी आता या सगळ्या गोंधळात काय नवा विकास आणतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल! जनतेला आशा आहे की, या नव्या अधिकाऱ्याच्या काळात फक्त पदभारच नाही, तर जबाबदारीचं भानही दिसेल.

Exit mobile version