। पनवेल । वार्ताहर ।
दुचाकी वाहनासाठी एम.एच. 46 सी.जी. ही नवीन मालिका पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेचा उरण, पनवेल, कर्जत, खालापूर येथील वाहनधारकांना लाभ घेता येणार असल्याने इच्छुकांना संपर्क करण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून नावे आकर्षित करू शकता. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक जर इतर वाहनांना हवा असल्यास निर्धारित रकमेच्या तिप्पट पैसे भरून तो नंबर ग्राहक आपल्या नावे आरक्षित करू शकतो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
तसेच या मालिकेतील आकर्षक एक या क्रमांकांसाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. पसंतीचा क्रमांक रक्षण करण्यासाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून मोटर वाहन नियमानूसार आकर्षक, अनाकर्षक नोंदणी क्रमांक करायचे असतील, त्यांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ लिपिक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.