इस्राईलने पुकारलं नवं युद्ध

लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीचे साखळी स्फोट; 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणार्‍या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर बुधवारीही या स्फोटांची मालिका सुरु असून आता यात 20 ठार झाल्याची बातमी आहे. तीन हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनॉनमधील चक्रावून टाकणार्‍या या स्फोटानंतर 60 घरे 15 कर आणि डझनभर दुचाक्यांना आग लागली असून अग्निश्मन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणार्‍या वॉकी टॉकीमध्ये देशातील दक्षिण भागात आणि राजधानीच्या दक्षिणेतील उपनगरांमध्ये स्फोट झाले आहेत. बुधवारी एक स्फोट झाला होता. त्या घटनेतील मृतांवर जिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्या जागेजवळ वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती होती.

लेबनॉनमधील निमलष्करी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या खिशामध्ये असलेल्या पेजरचा स्फोट झाल्याने हजारो लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये ही घटना घडली. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे पेजर्स हिजबुल्लाहततर्फे वापरण्यात येतात. देशभरात एकाच वेळी झालेल्या या हल्ल्यात 3000 हूनअधिक लोक जखमी झाले आहेत. 20 जण ठार झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाह या संघटनेने या हल्ल्याला इस्त्रायल जबाबदार असल्याचं म्हटलंय. हा हल्ला हिजबुल्लाच्या नेत्यांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. इस्राईलच्या गुप्तचर संस्था मोसादने लेबनॉनमधील अतिरेकी गटाने आयात केलेल्या पेजरमध्ये स्फोटके पेरली होती, असे सांगण्यात येत आहे.

लेबनॉनमधील वॉकी टॉकी स्फोटानंतर 20 ठार झाल्याचे सांगण्यात आल्यानंतर इस्राईलचे संरक्षण मंत्री गॅलंट यांनी बुधवारी युद्धाच्या नव्या टप्प्यात प्रवेश केल्याचं सांगितलं. तर हिजबुल्लाहच्या नेत्यांनी इस्राईलच्या गुप्तचर संस्थेवर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले, धैर्य, दृढनिश्‍चय आणि चिकाटी आवश्यक असून आम्ही युध्दाचा एक नवीन टप्पा उघडत आहोत. असं म्हटलंय. लेबनीज अंतर्गत सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, स्फोटांची दुसरी लाट येण्याच्या एक दिवस आधी देशभरात अनेक वायरलेस कम्युनिकेशन उपकरणांचा स्फोट झाला. हे स्फोट विशेषत: हिजबुल्लाहचा गड-बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरात झाले.

Exit mobile version