| पनवेल | वार्ताहर |
मोटारसायकलने दिलेल्या धडकेत चाळीस वर्षीय पादचारी जखमी झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संदीप पालवे असे या जखमी पादचाऱ्याचे नाव असून ते वरप, कल्याण येथे राहतात. संदीप पालवे हे जेडब्ल्यूआर कंपनीच्या समोरील पनवेल – जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उभे होते. यावेळी जेएनपीटीकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव दुचाकी चालकाने संदीप पालवे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत संदीप पालवे यांच्या छातीला आणि उजव्या पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाली. त्यानंतर संदीप पालवे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पनवेल पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला असल्याचे सांगण्यात आले आहे.





